Saturday 10 December 2011

ती फक्त त्याच्यासाठी! 
{एक ह्र्दयस्पर्शी घटना}

Monday 21 November 2011

तू नसताना.........

“आज तिचा फोन आला ,, शब्दाऐवजी अश्रूंच्या हुंद्क्याचा आवाज झाला ,, स्वतःला सावरून तिन 
सांगितलं ,अरे माझ लग्न ठरलं ,, ति सावरली पण तो क्षणात ढासळला ,, अन मग दोघ्यांच्या 
आसवांपुडे पावसाचा वर्षाव कमी वाटू लागला ,, शब्द सगळे हवेत विरले.,, ति म्हणाली माफ 
करशील ना रे मला ?? तो म्हणाला आपराध्यासारखी माफी का मागतेस ? कर्तव्यापुरती करून तू 
आई वडिलांचा मन राखातेस ,, या जन्मी नाही झालीस माझी ,, तरी पुढच्या जन्मी तुझ्यावर फक्त 
माझा हक्क असेल ,, ऐकून म्हणाली हृदयाच्या कप्यात आठवनीच्या कोपऱ्यात फक्त तुझी प्रतिमा 
असेल ,, धीर देऊन त्यान तिचा फोन ठेवला,, कुणाला अश्रू दिसू नयेत म्हणून तो पावसात जाऊन 
उभा राहिला.........................

Saturday 1 October 2011

एक सुंदर कथा ...परीस स्पर्श

एक माणूस परीस शोधायला निघाला त्यासाठी रस्त्यात जो दगड
येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा
दिनक्रम सुरू झाला दिवस गेले महिने लोटले... वर्षे सरली पण
त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा... .

शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले...

ती साखळी सोन्याची झाली होती.....
दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही....

तात्पर्य:

प्रतेकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो...कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या
नात्याने.. .तर कधी मित्राच्या मैत्रिणीच् या नात्याने .....
तर कधी प्रेयसीच्या नात्याने कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो... आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो आपण जे काही असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो .......

पण फार कमी लोक या परीसाला ओळखू शकतात......................................






Tuesday 13 September 2011

चिखलातील कमळ......





एका तलावाच्या काठावर...........
प्रियकर :- चल तिथे बसू, किती छान कमळ आहे बघ ...!!!
प्रेयसी :- ई !! ... नको, खाली किती चिखल आहे बघ त्यापेक्षा तलावाच्या त्या बाजूला बसू,किती छान बदके आहेत बघ....
प्रियकर :- वरवरच्या सौंदर्या कडे आपण बघतो म्हणूनच आत मधले प्रेम लवकर कळून येत नाही वास्तविक मी तुझ्यावर," त्या पांढर्या शुभ्र सुंदर बदकांसारखे नव्हे तर चिखलात उमललेल्या कमळासारखे प्रेम करतो"
प्रेयसी :- ते कसे ?
प्रियकर :- "जे पक्षी तलावाच्या पाण्यात राहतात ते तलाव सुकून गेल्यावर दुसरीकडे उडून जातात,तेच जे कमळ त्या तलावात वाढते ते मात्र त्या तलावा बरोबरच मरते" ............

Saturday 23 July 2011


एक मुलगा होता, कैंसर असलेला आणि जास्तीतजास्त एकच महीने आयुष्य असलेला. 
एक मुलगी त्याला आवडत होती, जी एका Music CD च्या दुकानामध्ये काम करीत होती.
परंतु त्याने त्या मुलीला आपल्या प्रेमाविषयी काहीच सांगितलेले नव्ह्ते…..
नेहमी तो तिच्या दुकानात जात होता आणि एक सीडी विकत घेत होता, का – तर तिच्याशी दोन शब्द बोलता यावे म्हणून ….
महीना उलटला…त्याचे आयुष्य ही संपले.
महिन्यानंतर ती मुलगी त्याच्या घरी जाते….तो गेलेला आसतो हे त्याच्या आईकडून तिला कळते.
तिला वाईट वाटत. आणि एक गोष्ट तिला तिथे दिसते ती अशी की, त्या सर्व सीडींपैकी एकपन सीडी त्याने उघडूनसुद्धा पाहिलेली नसते. याचे तिला खूप रडू येते. ती रडते रडते आणि शेवटी ती पण निघून जाते.
तिच्या रडण्याचे कारण की, त्याला दिलेल्या प्रत्येक सिडिच्या कव्हरमध्ये त्याच्यासाठी एक चिट्ठी तिने ठेवली होती.
ती सुद्धा त्याच्यावर प्रेम करत होती…………

Thursday 21 July 2011

एक मस्त प्रेम कथा

२० वर्षाच्या एका मुलाला रस्त्याच्या बाजूला एका १६ वर्षाच्या सुंदर मुलीचा फोटो सापडतो . अन तो मुलगा तिच्या प्रेमात पडतो ,LOVE AT FIRST SITE वाले प्रेम
त्याचे प्रेम त्यीच्याबद्दल दिवसेन दिवस वाडतच जाते .
तो त्या मुलीवर खूप प्रेम करायला लागतो .
पण तो कधीच तिला भेटू शकत नाही

.
.
खूप वर्षानंतर त्याची बायको फोटो पाहून त्याला विचारते .,
तुम्हाला हा फोटो कुठे भेटला ?
तो विचारतो , का ? ???????????
ती बोलते -मी हा फोटो लहानपणी हरवला होता , त्यावेळी मी १६ वर्ष्याची होती .
 

Wednesday 20 July 2011

प्रेम म्हणजे काय?

आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो? आपण कधी त्याचा विचार करतो का? बऱ्याचदा नाही. मग खाली दिलेली ही गोष्ट वाचा. प्रेम म्हणजे काय याचा अर्थ कदाचित तुम्हाला कळेल.

एकदा एका प्रेयसीनं तिच्या प्रियकराला विचारलं,
सांग बरं तुला मी का आवडते? तू माझ्यावर प्रेम का करतो?
अगं, मी अशी काही कारणं सांगू शकत नाही. पण तू मला आवडतेस हे मात्र नक्की. 

अरे तू माझ्यावर प्रेम करतोस, मग तुला माहित नाही, तू का प्रेम करतोयस ते? तुला मी का आवडते हेच माहित नसेल तर तुला माझ्याविषयी वाटणाऱ्या भावनेला प्रेम तरी का म्हणायचे?

प्रिये, अगं खरंच. मला त्याचं कारण माहित नाहीये. पण तरीही माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी ते सिद्ध करू शकतो. 
सिद्ध काय कसंही करू शकशील रे. पण मला कारण हवंय. माझ्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडने ती का आवडते याची ढिगानं कारणं दिली होती. तुला एवढीही कारणं सुचत नाहीयेत?

ठीक आहे. तुला कारणंच हवीत ना मग ही घे सांगतो. 
मला तू आवडते कारण तू सुंदर आहेस.
तुझा आवाज सुंदर आहे.
तू अतिशय काळजी घेणारी आहेस. 
तू अतिशय प्रेमळ आहेस 
तू विचारी आहेस.
तुझे हास्य मोहक आहे. 
तूझी प्रत्येक हालचाल मला वेड लावते.

प्रेयसी प्रियकराच्या या स्पष्टीकरणावर जाम खुश झाली. दुर्देवाने काही दिवसांनंतर त्या प्रेयसीला अपघात झाला आणि ती कोमात गेली. प्रियकर तिला लगोलग भेटायला गेला. पण कोमात असल्याने संवाद साधणंच शक्य नव्हतं. अखेर निरूपायने तो एक पत्र तिच्या उशाशी ठेवून गेला. त्या पत्रातला मजकूर असा.

प्रिये, 
तुझ्या गोड आवाजावर मी प्रेम करत होतो.
पण आता तू बोलू शकतेस का?
नाही. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.

तुझा काळजी घेण्याचा स्वभाव मला आवडायचा. पण आता तू तो स्वभाव दाखवूच शकत नाही. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.

तुझे मोहक हास्य नि तुझे विभ्रम मला चित्तवेधक वाटायचे. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करायचो. 
पण आतातू हसू शकतेस? तुझे विभ्रम दाखवू शकतेस? नाही. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही. 
प्रेम करण्यासाठीच कारणंच हवी असतील तर आत्ता याक्षणी तुझ्यावर प्रेम करण्यासाठी माझ्याकडे कारणच नाही. 

खरोखरच प्रेमाला कारणांची गरज असते? 
नाही. नक्कीच नाही. म्हणूनच....
मी अजूनही तुझ्यावर तितकंच गाढ प्रेम करतोय. 

खरे प्रेम कायम रहाते. उडते ती वासना. 
प्रेमाचे बंध आयुष्यभरासाठी असतात, पण ते प्रेमात पडलेल्यांना पुढे नेतात. मागे खेचत नाहीत.
बालिश प्रेम म्हणते, मला तुझी गरज आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो.
परिपक्व झालेले प्रेम म्हणते, मी प्रेम करतो म्हणून मला तुझी गरज आहे. 
तुमच्या आयुष्यात कुणी यावं हे तुमच्या कपाळावरची नशीबाची रेषा सांगते, पण तुमच्या आयुष्यात कुणी थांबायचं हे तुमचे ह्रदय ठरवते. 
प्रेमकथा महत्त्वाच्या नसतात, महत्त्वाची असते, ती तुमच्यातील प्रेम करण्याची क्षमता.

Thursday 23 June 2011

हृदयस्पर्शी पण छोटी कथा - "क्षितीजा पलीकडील प्रेम




अंजली:- "हो विशाल, तू चांगला मुलगा आहेस, ........... पण मी राहुल ला

सोडू नाही शकत....... कारण राहुलच्या हृदयाला होल आहे आणि आता त्याच्याकडे कमी दिवस राहीले आहेत, त्याचे 


राहिलेले आयुष्य मी त्याच्या बरोबर राहावे अशी आमची दोघांची इच्छा आहे...........

कारण आमचे प्रेम खरे आहे "

विशाल:- "माझे पण तुझ्यावर खरे प्रेम आहे त्यामुळे तुला आमच्या दोघांपैकी एकाची निवड करावि लागेल"

अंजली :- "राहुल कडे कमी आयुष्य आहे म्हणून मी त्याला सोडून तुझ्याबरोबर येऊन खर्या प्रेमाचे नाव बदनाम नाही करू शकत" So I am sorry Vishal........!!


(10 दिवसांनतर)


राहुल :- "अंजली एक आनंदाची बातमी,....... मी heart transplant करून घेतले,......... दोघेही खूप खुश झाले.......

तितक्यात डॉक्टरांनी त्यांना एक पत्र दिले,

त्या पत्रात लिहिले होते की,



"अंजली मी तुमच्या प्रेमामधे येऊ शकत

नाही...... पण तुझ्यावर प्रेम करणेही थांबवु शकत नाही आणि तुझ्या शिवाय

जगू सुधा शकत नाही, म्हणून मी माझे हृदय राहुलला दिले आहे फक्त एका

छोट्या अपेक्षेने की मलाही तुझे प्रेम मिळत राहील"

I love you and now have a long love life ahead. फक्त तुझाच, स्वर्गवासी


Saturday 18 June 2011

साहसी प्रेम....

शिकारीचा आजचा सातवा दिवस होता. संघ्‍याकाळी टॉर्च आणि धनुष्‍यबाण घेऊन तो जंगलाकडे निघाला. शिकारीचा शोध सुरू झाला आणि अचानक त्‍याला आदिवासी वस्‍तीच्‍या जवळच्‍या झुडपाजवळ काही तरी दिसलं. तो थांबला. झाडाच्‍या कडेला हरण उभे होते. त्‍या हरणावर त्‍याने नेम धरला आणि बाण सोडणार तोच तो थबकला. त्‍याने पुन्‍हा त्‍या हरणाच्‍या डोळयात पाहिले आणि त्‍याच्‍या हातातला धनुष्‍यबाण निखळला...

गेले सहा दिवस तो सतत तिथं यायचा शिकारीला निघाला की ते हरण त्‍याला तिथंच उभं असलेलं दिसायचं. तो रोज त्‍या हरणावर लक्ष केंद्रीत करून नेम धरायचा आणि त्‍याच्‍या डोळ्यांतला करुण भाव पाहून त्‍याच्‍या हातातला धनुष्‍यबाण निखळायचा. हे असं का घडतयं या विचारानं त्‍याला अस्‍वस्‍थ केलं होतं.

त्‍यानं ठर‍वलं आणि त्‍या जंगलातल्‍या एका थोराड आदिवासी गृहस्‍थाला त्‍यानं विचारलं. त्‍याला सांगितलं की ते हरण रोज तिथं येत आणि तो त्‍याच्‍यावर नेम धरूनही बाण चालवू का शकत नाही.

तो वृध्‍द म्‍हणाला, खरं सांगू हे हरीण रोज आम्‍ही वाजत असलेला ढोल ऐकण्‍यासाठी इथं येतं. वा-याचा आवाज झाला तरीही घाबरून पळून जाणारे भित्रे हरीण ढोल ऐकायला येत हे काही त्‍याला पटलं नाही. त्‍यानं पुन्‍हा विचारलं. हे कसं शक्‍य आहे, हरणासारख्‍या भित्र्या प्राण्‍याने इतकं साहस करणं शक्‍यच नाही. त्‍याच्‍या डोळ्यात तो करूण भाव का असतो, की जो पाहताच शिका-याच्‍या हातातलं धनुष्‍यबाण खाली पडतो. त्‍याची गोंधळलेली अवस्‍था पाहताच तो वृध्‍द म्‍हणाला, ते हरीण इथं येतं आम्‍ही वाजवत असलेला ढोल पाहण्‍यासाठीच. त्‍याच्‍यातल्‍या त्‍या साहस आणि आणि डोळयातल्‍या कारुण्‍याचं कारण एकच आहे... या ढोलावरच कातडं आहे त्‍याच्‍या जीवनसाथीच....!

Tuesday 14 June 2011

गुलाबावर प्रेम.........



एक चिमणी एका पांढरया गुलाबावर प्रेम करत असते एके दिवशी ती आपले प्रेम व्यक्त करते. पण गुलाब म्हणतो,कि जेव्हा तो स्वता लाल रंगाचा बनेल तेव्हा तो चिमणीवर प्रेम करेल्,चिमणी आपले पंख कापुन रक्त गुलाबावर सांङते गुलाब लाल बनतो.पण आता चिमणी नसते हेच प्रेम असते.

Tuesday 26 April 2011

एक मुलगा होता, कैंसर असलेला आणि जास्तीतजास्त एकच महीने आयुष्य असलेला.

एक मुलगी त्याला आवडत होती, जी एका Music CD च्या दुकानामध्ये काम करीत होती.

परंतु त्याने त्या मुलीला आपल्या प्रेमाविषयी काहीच सांगितलेले नव्ह्ते.....


नेहमी तो तिच्या दुकानात जात होता आणि एक सीडी विकत घेत होता,
का - तर तिच्याशी दोन शब्द बोलता यावे म्हणून ....
महीना उलटला...त्याचे आयुष्य ही संपले.

महिन्यानंतर ती मुलगी त्याच्या घरी जाते....तो गेलेला आसतो हे त्याच्या आईकडून तिला कळते.


तिला वाईट वाटत. आणि एक गोष्ट तिला तिथे दिसते ती अशी की, त्या सर्व सीडींपैकी एकपन सीडी त्याने उघडूनसुद्धा पाहिलेली नसते. याचे तिला खूप रडू येते.
ती रडते रडते आणि शेवटी ती पण निघून जाते.

तिच्या रडण्याचे कारण की, त्याला दिलेल्या प्रत्येक सिडिच्या कव्हरमध्ये त्याच्यासाठी एक चिट्ठी तिने ठेवली होती.
ती सुद्धा त्याच्यावर प्रेम करत होती.........

Monday 25 April 2011

अधुरी प्रेम कहाणी........


१५ वर्षापूर्वीची गोष्ट असेल. मी त्यावेळेला शाळेत होतो. शाळा सुटली की माझा क्लास असायाचा. शाळा सकाळची होती ७ ते १२ वाजेपर्यंत आणि क्लास ३ ते ५ वाजेपर्यंत. क्लास मधे माझ्या बाजूला एक देखणा मुलगा बसायचा. पहिल्या दिवसापासून तो माझ्या बाजूला बसत होता आणि चांगला मित्र पण झाला होता. आपण त्याला ह्या गोष्टी चा राजा म्हणुया. आमच्या क्लास मधे आमच्या शाळेशिवाय ईतर मुले मुली पण असायचे. राजा पण दुसर्‍या शाळेतला होता. आम्ही क्लास मध्येच एकत्र भेटायचो. एकदम मनमोकळा स्वभावाचा. नेहमी हसरा चेहरा. एक साइड चा भांग पाडला कि दिसायला विनोद खन्ना होता. घरची परिस्थिती पण चांगली होते. त्यावेळेला सुद्धा आम्हा सर्वाना वडापाव, चॉकलेट घ्यायची त्याची ऐपत असायची. आमच्या खिशात त्यावेळेला चुकून माकून एखादे चार आणे मिळाले तर नशीब. पॉकेटमनी हा प्रकारच अस्तित्वात नव्ह्ता. पहिल्या दिवशी क्लास मधे आल्यापासून तो माझा चांगला मित्र झाला. क्लास सुटल्यावर पण आम्ही खूप धमाल करू. त्यावेळेला त्याच्या कडे सायकल होती. त्यावेळेला सायकल असणे म्हणजे आता कॉलेजात जाणार्‍या मुलाकडे मर्सिडीज असण्यासारखे होते. आम्ही डबल सीट बसायचो, अर्थात सायकल तोच चालवायचा. मला घराच्या मागच्या गल्लीत सोडायचा आणि निघून जायचा.
आमच्या क्लास मधे एक सुंदर मुलगी पण होती. लांबसडक पाठीवर रुळणारे केस, गोरीपान काया, अंगाने नाजुक शिडशिडित बांध्याची, पाणीदार डोळ्यांची. हिच ह्या कथेची “राणी”. हा राजा आणि राणी एकाच शाळेत आणि एकाच वर्गात पण होते. दोघे राहायला पण बाजूबाजूच्या सोसायटी मधे होते. राजा च्या बिल्डिंग च्या बाजुने पोलिस वसाहत चालु होत होती. तिचे वडिल पोलिस खात्यात कामाला होते. चांगल्या वरच्या पोस्ट वर होते त्यामुळे त्यांना जरा बर्‍यापैकी बिल्डिंग मध्ये रहायला मिळाले होते. राजा मुळे माझी आणि तिची ओळख झाली. मी, राजा, राणी आणि तिच्या दोन मैत्रीणी असा आमचा चांगला ग्रुप तयार झाला होता. इतर कोणाला आम्ही ग्रुप मधे घेतलेच नाही. क्लास सुरू व्हायच्या आधी आणि सुटल्या नंतर आम्ही क्लासच्या बाहेरच्या कठ्ठ्यावर गप्पा मारता बसायचो. एक गोष्ट आमच्या नजरेतुन सुटत नव्हती ती म्हणजे राजा चे राणी कडे बघणे आणि राणी ने त्याला प्रतिसाद देणे. त्यावेळचे प्रेम आता सारखे फास्ट फॉरवर्ड नव्हते. त्यावेळेला नजरेवरच सगळी भिस्त असायची. मेसेजेस पोचवायला एक तर मित्र मैत्रिणी नाही तर लायब्ररीची पुस्तके. मोबाईल काय असते हे तर दूरदूर पर्यंत माहित नव्हते. घरात एखाद्याच्याच घरी एमटीएनल चा फोन असायचा आणि पूर्ण चाळी ची भिस्त त्या नंबर वर असायची. फ्रेंडशिप डे, वॅलेन्टाईन डे वगैरे गोष्टी अजुन सातासमुद्रापारच होत्या. त्यामुळे एखादी मुली बरोबर मैत्री करायची असेल तर डेरिंग करण्याशिवाय पर्याय नसायचा अन्यथा मुलगी डेरिंग करून रक्षा बंधन ला राखी बांधायला यायची.
तर अश्या जमान्यात राजा आणि राणी च्या कच्च्या प्रेमाचे अंकुर फुटत होते. गप्पा मारताना हळूच एकमेकांकडे बघुन हसणे, डोळ्यांच्या खाणाखूणा होणे, गप्पा मारताना दोघांचे एका विषयावर एकमत होणे आणि उस्फुर्तपणे टाळी देणे, टाळी दिल्यावर रानीचे हळूच लाजून मान खाली घालणे, क्लास मधे आल्यावर पहिले एकमेकांना शोधणे आणि नेहमीच्या जागेवर दिसले नाही तर चेहर्‍यावर चलबिचल होणे. कधी राजा उशिरा आला की रानीचे क्लास च्या दरवाज्याकडे एकटक बघत वाट पहाणे आणि राजाने आत प्रवेश केला की दोघांची नजरानजर होणे, मग राजा आत येऊन जागेवर बसे पर्यंत राणी त्याच्याकडे पाहत राहायची. एकदा राजा बसला की मग तो राणी कडे पाहायचा. मग राणी खुणेनेच विचारायची, ‘ का रे? एवढा उशीर का झाला?’ राजा मग मान हलवून डोळ्याच्या पापण्याची उघडझाप करून सांगायचा, ‘ काही नाही ग! असचं !”. मग क्लास चालू असताना एकमेकांकडे लक्ष नसताना बघणे आणि चुकूनमाकून नजरानजर झाल्यावर माना खाली घालून हसणे. हे लगेच आम्हाला समजून येऊ लागले होते. पण कोणी च काही बोलता नव्हते. आम्हां सगळ्यांना त्यांची जोडी आवडत होती पण जो पर्यंत त्यांच्या मनातले समजत नव्हते तो पर्यंत आम्हाला पुढाकारही घेता येत नव्हता.
तरी आम्ही त्यांना सपोर्ट करायला कधीच सुरुवात केली होती. ग्रुप मधे बसलो असताना आम्ही खास करून दोघांना एकमेकांच्या बाजूला बसायला जागा द्यायचो. तेव्हा राजाच्या होणार्‍या ओझारत्या स्पर्शाने राणी ची कळी खुलायची आणि तिचे गोरे गाल लाल टमाटर सारखे होऊन जायचे. तर तिचे लाजणे बघुना राजा ची स्वारी एकदम खुष होऊन जायची. क्लास सुटल्यावर आम्ही सगळे जण राणी च्या घरापर्यंत चालत जायचो. एक एक मैत्रिणी ला सोडत सर्वात शेवटी राणी चे घर यायचे. मुद्दाम आम्ही मोठा वळसा घालून तिच्या बिल्डिंग पर्यंत पोहचायचो. एकदा का मैत्रीणी गेल्या की मग राजा आणि राणीच चालायचे. मी राजाची सायकल घेऊन बाजूने चालायचो. जेणे करुन दोघांना एकांत मिळावा पण एवढे पण बाजूला नाही चालायचो की जेणे करून इतर लोकांना संशय येईल. चालताना एकमेकां कडे बघणे, गप्पा मारताना ओठांपेक्षा डोळ्यांनी जास्त बोलणे हे सारे आम्हांला समजू लागले होते. त्यांना वाटायचे आम्हाला कोणी बघितलेच नाही आणि आम्ही ही त्यांना तसे कधी जाणवू दिले नाही. राणीला घरी सोडल्यावर राजा मला डबल सीट घेऊन माझ्या बिल्डिंग च्या मागच्या गल्लीत सोडायचा आणि मग निघून जायचा.
आमच्या नजरे समोर त्यांचा प्रेमाचा वृक्ष बहरू लागला होता. पण दोघांनी एकमेकांना अजूनही मागणी घातली नव्हती की एकमेकांच्या निदर्शनासही आणून दिले नव्हते. एके दिवशी आम्ही राणी ला तिच्या बिल्डिंग जवळ सोडून माझ्या घरी परतत होतो तेव्हा राजाने न राहवून मला विचारले, ‘ अरे यार ! आज काल मला कसे तरीच होते आहे. राणी ला घरी सोडले की जिव कासावीस होऊन जातो रे. रात्री पण तिची खूप आठवण येते. मग तिच्या दिलेल्या नोटस घेऊन झोपतो. तेव्हा कुठे झोप येते. काय होतेय तेच समजत नाही…तिला पण असेच होत असेल का रे?’ मी म्हटले, ‘मित्रा! तुला बहुतेक प्रेम झालेय. तिच्या मनात काय आहे ते आपण उद्दया विचारूया. आता घरी जा.’ दुसर्‍या दिवशी तो लवकरच आला पण त्याला तिला विचारायचा धीर च नाही झाला. मी म्हटले, राहू दे, जसे चालले आहे तसे चालु दे. २/३ महिने असेच उलटून गेले. दोघांनी एकमेकांना काही प्रेमाची कबुली दिली नाही. सर्व नेहमी सारखेच चालले होते. पण बेचैनी वाढत होती. शेवटी राजा ने डेरिंग करायची ठरवली आणि मागणी घालायची ठरवली. खूप विचाराअंती असे ठरले की तिला एक चिठ्ठी लिहायची. आणि क्लास सुटताना तिच्या हातात द्यायची आणि निघुन जायचे. तिला विचार करायला वेळ द्यायचा आणि दुसर्‍या दिवशी भेटायचे. मोठ्या मुश्किलीने पत्राचा मायना सुचला आणि राजाने पहिले प्रेमपत्र लिहिले. दोन दिवस तो चिठ्ठी घेउन तसाच फिरत होता. डेरिंग च होत नव्हती.
चवथ्या दिवशी तो क्लास मध्ये लवकरच आला. थोडा टेंशन मधे दिसता होता. मला वाटले की प्रपोझ करायचे आहे म्हणून टेंशन आहे. मी विचारले काय झाले तर म्हणाला, अरे यार! आज ती शाळेत आलीच नाही रे. खूप दिवस बेकार गेला. तिच्या बिल्डींग खाली एक चक्कर मारुन आलो तर ती गॅलरी मधे दिसली पण तिने बघुन सुद्धा न बघीतल्यासारखे केले आणि न हसताच आत निघून गेली. असं कधीच झाले नव्हते रे!!! काय झाले तिला? तिला समजले असेल का मी तिला प्रपोझ करणार आहे ते? म्हणुन रागवली आहे का?
मी म्हटले, ‘रिलॅक्स !!! शांत हो टेंशन नको घेऊस, ती आता क्लास ला येतेय का बघुया मग काय ते समजेल.’
आम्ही तिची वाट बघत क्लासच्या बाहेर उभे राहिलो. थोड्या वेळाने ती आली पण एकच नजर टाकली आणि निघून गेली. नेहमीसारखे हाय नाही की चेहर्‍यावर हसू नाही. चेहरा खूप लाल झाला होता. डोळे सुजले होते. बहुतेक खूप रडली होती. तशीच न बोलता जाग्यावर जाउन बसली होती. आम्ही पण जाउन बसलो. कधी एकदा क्लास संपतो आणि तिच्याशी बोलतोय असे राजाला झाले होते. शेवटी कसा बसा क्लास संपला पण आमचा ग्रुप तसाच बसुन राहिला होता. ती पण तशीच बसली होती. मी त्याच्या हातात चिठ्ठी कोंबली आणि लांब जाउन बसलो. तिच्या मैत्रीणी पण लांब जाउन बसल्या. राजा उठला आणि तिच्या जवळ गेला. हातातली चिठ्ठी तिच्या हातात देण्यासाठी तिचा हात हातात पकडला आणि तिच्या हातात चिठ्ठी देण्यासाठी तिची मुठ उघडली तर तिच्या हातात अगोदरच एक चिठ्ठी होती. तिने खुणेनेच सांगितली की ती तुझ्या साठिच आहे. राजा ने आपली चिठ्ठी तिच्या हाताता दिली आणि तिची चिठ्ठी हातात घेतली. थरथरत्या हाताने चिठ्ठी उघडली भडाभडा वाचली आणि आनंदाने उडीच मारली. आणि माझ्या कडे बघुन तिच्या चिठ्ठीचे चुंबन घेतले. तिने पण चिठ्ठीत तेच लिहिले होते आणि त्याला प्रेमाची मागणी घातली होती. तो खूप खुश झाला आणि आमचे टेन्शन कमी झाले. काय पण प्रेम म्हणावे. दोघांचे खरच एकमेकांवर मनापासून प्रेम होते. दोघांना पण एकाच दिवशी प्रपोझ करावासा वाटला.
दोघेही एकमेकांना आवडत होते. आम्ही खुप खुश झालो. पण राणी च्या मनात काही वेगळेच होते. तिने चिठ्ठी वाचली तिच्या चेहर्‍यावर हसु उमटले…डोळ्यात अश्रु आले. तशाच भरल्या डोळ्यांनी चिठ्ठी दोन्ही हातात घेउन ति राजा कडे दोन मिनिटे बघत राहिली आणि मटकन खाली बसली व शेवटी तिने थांबवून ठेवलेले अश्रू मोकळे केले आणि जोराने हुंदका फोडला. आम्हाला काय झाले समजलेच नाही आम्ही तिच्या जवळ गेलो आणि तिला शांत केले आणि विचारले. मोठ्या मुश्किलीने तिने हुंदका आवरला आणि राजा चा हात हातात घेतला आणि म्हणाली, “मी हि चिठ्ठी तुला दोन दिवसांपुर्वीच लिहिली होती पण द्यायला हिंमतच होत नव्हती. मला पण तु खुप आवडतोस रे! पण…..” आणि तिने एक मोठा पॉझ घेतला. हमसुन रडायला लागली.
ती पाच सेकंद पण आमच्या काळजाचा ठोका चुकवुन गेली. ती म्हणाली, ‘माझ्या बाबांची बदलीची ऑर्डर आली आहे. आम्हाला उद्याच ठाणे सोडून कोल्हापुरा ला जायचेय..” तिच्या एका वाक्याने आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आता कुठे प्रेमाला सुरवात झाली होती आणि जुदाई पण आली. आम्ही कोणी काहीच बोललो नाही. पुढे काहि चर्चा करण्यात अर्थच नव्ह्ता. सर्व शांत झाले होते. तसेच क्लास मधुन बाहेर पडलो नेहमी प्रमाणे चालू लागलो. मी सायकल घेतली आणि पुढे पुढे चालू लागलो. एक एक करत सगळ्या मैत्रिणींना सोडले आणि तिच्या बिल्डींग खाली पोचलो. दोघे काही न बोलता तसेच बघत राहीले. कोणाला काही सुचतच नव्हते. मी शेवटी विचारले, ‘उद्या किती वाजता निघणार आहे.’
ती म्हणाली, ‘सकाळीच सहा वाजता सामान भरायला गाडी येईल आणि आठ वाजेपर्यंत निघुन जावू.’ तसच जड अंत:करणाने आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
राजा सायकल वर सोडायला आला. बिल्डिंगच्या मागच्या गल्लीत उतरलो आणि राजाने इतका वेळ थांबून ठेवेलेले मन मोकळे केले. अगदी मनसोक्त रडला. मी फक्त त्याच्या पाठीवर थोपटत राहिलो दुसरे काय करू शकणार होतो. त्याच्या जागी जर मी असतो तर कदाचित मी काहीं वेगळे नसते केले. रडण्याचा भर ओसरल्यावर मी त्याला विचारले की तू जाणार आहेस का सकाळी? तो नाही म्हणाला. मला तिला सोडून जाताना बघवणार नाही…. ‘अरे पण ती वाट बघत राहिली तर?’ मी म्हणालो. ‘नाही बघणार आणि वाट बघितली तरी ती समजून जाईल.’ असे म्हणून त्याने खिशातली चिठ्ठी काढली आणि परत परत वाचत रडत राहिला.
पुढचे ४/५ दिवस राजा क्लासला आलाच नाही. मित्राकडे विचारले तर म्हणाला कि राजा शाळेत पणा नाही आला होता.. कदाचित तब्येत बरी नाही. विचार केला आज संध्याकाळी त्याच्या घरी जाउन बघुया. क्लास सुटल्यावर त्याच्या घरी गेलो. हा शांतापणे चादर घेऊन गादी वर पडला होता. आई ने सांगितले, ‘अरे दोन दिवसापासुन तब्येत बरी नाही. काही खातच नाही आहे. डॉक्टरांकडे घेऊन गेली तर ते म्हणाले काही झाले नाही…पण दिवसरभर झोपुनच आहे.’ मी त्याच्या बेड जवळ गेलो, त्याच्या डोक्यावरची चादर खाली केली. गोरा चेहरा लाल लाल झाला होता. कदाचित घरातल्यांची नजर चुकवून खूप रडला असावा. उशी पण ओली झाली होती रडून रडून.
मी विचारले…काय झाले?
 ‘काही नाही रे… तुला माहीत आहे ना.’ राजा म्हणाला.
‘तू गेला होतासा का तिला सकाळी निरोप द्यायला?’…मी
‘हो गेलो होतो. पण तिच्या समोर नाही गेलो. झाडामागुनच बघत होतो. ती खूप शोधता होती रे मला. सारखी माझ्या बिल्डिंग कडे बघत होती तिला वाटले होते की मी येईन. मला समोर जायची डेरिंग च नाही झाली. कदाचित गेलो असतो तर मला रडणे थांबवता आले नसते. शेवटी ती गाडीत बसली. तेव्हा मी झाडामागून बाहेर आलो आणि गाडी चालू झाल्यावर तिला हात दाखवला. कारण ती गाडी थांबवू शकत नव्हती हे मला माहित होते’ ‘तिने मला व मी तिला शेवटचे बघितले आणी हात उंचावुन टाटा केला…तिने पण केला…डोळ्यात पाणी असल्यामुळे तिचा चेहराच बघू नाही शकलो रे. आता ती कधीच भेटणार नाही ह्याचे खूप दु:ख वाटतेय रे…मन नुसते तुटतयं, छातीत एक असह्य कळ येतेय. मी तिच्या समोर नाही आलो म्हणुन कदाचित रागावली असेल ना रे?’
 सगळा प्रसंग माझ्या डोळ्यासमोरुन गेला आणि हलकेच डोळ्यात पाणी उभे राहिले. मी चेहरा बाजुला करुन पाणी टिपले आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणालो, ‘उद्या शाळेत जा, क्लासला यायला सुरवात कर जरा बरे वाटेल’.
 राजा मग पुढे एक आठवडाच च क्लासला आला. तिच्या रिकाम्या जागेकडे बघुन ढसाढसा रडायचा. तिची खुप आठवण यायची म्हणुन त्याने क्लासच सोडून दिला. मला कधी कधी भेटायचा चेहर्‍यावरचे सर्व तेजच निघून गेले होते. हसणे तर विसरल्यातच जमा होते. पुढे त्याच्या वडिलांची पण बदली झाली आणि तो पुण्याला गेला. जाताना भेटूना गेला, म्हणाला, पुण्या पासून कोल्हापूर जवळ आहे, कधी तरी जाउन येइन. बघू नशिबात असेल तर भेट होईल.
 त्यानंतर तो कधी भेटलाच नाही. त्याचा काही फोन नंबर माझ्याकडे नाही आणि माझा त्याच्याकडे नाही. राजा आणि राणी दोघे ही कधी मला भेटले नाहीत. आता भेटली तरी मला ओळखताही येणार नाही. त्यांना मला ओळखता येणार नाही. जर ते दोघे ह्या इंटरेनेट जाला वर असतील आणि माझा ब्लॉग चुकून वाचतील तर बरे होईल. माझ्याशी संपर्क तरी करतील. मी अजुन तिथेच राहतोय. कधी येऊन आवश्य भेटा.

Saturday 23 April 2011

एक थेंब प्रेमाचा....

एकदा तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ती तिच्या प्रियकराची वाट बघत बसली होती ती खूप खुश होती कारण  आज तिला तिच्या प्रियकराकडून अंगठी मिळणार होती.ह्या स्वप्नात ती पूर्ण रंगून गेली होती तेवढ्यात तिचा प्रियकर आला त्याला बघून तिला खूप आनंद झाला त्याने तिला Birthday -wish केले, आणि वाढदिवसाची भेट म्हणून teddy bear दिला teddy bear बघून ती नाराज झाली, कारण तिला अंगठी पाहिजे होती ह्या रागात तिने तो teddy मागे फेकून दिला, रस्त्यावर  पडलेला teddy पाहून तिचा प्रियकर तो teddy उचलायला गेला तेव्हड्यात मागून येणार्या गाडीने त्याला उडविले आणि तो जागीच मरण पावला. हे पाहून तिच्या डोळ्यातून मुसळधार पाउस पडू लागला आक्रोश करून ती रडू लागली आणि तिने तो teddy घेऊन त्याला घट्ट मिठी मारली तेवढ्यात त्या teddy मध्ये असलेल्या मशीन  मधून आवाज आला कि," प्रिये, अंगठी माझ्या (teddy च्या) खिशात आहे, Will you plz maary me?" -- *आठवण माझी कधीतरी येईलच तुला, तु कदाचीत रडशीलही, हात तुझे जुळवुन ठेव तु, सगळी आसवं तुझी त्यात सामावतील, जो थांबला तुझ्या हातावर, नीट बघ त्याच्याकडे, एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल.....

म्हणतात ना प्रेम हे आंधळ असत...

ती जन्मताच आंधळी, त्यामुळे सगळ्यांच्याच तिरस्कारास पात्र.
आई-वडील, सख्खे भाऊ, बहिणींही एक डोक्यावरच न टाळता येणार ओझं म्हणून सहन करणारे.

ह्यात एकच समाधानाची बाब 
म्हणजे तिचा प्रियकर.
तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा, 
तिच्या अंधपणाचा कोणताही बाऊ न करता.
मग तिला वाटायचे आपण खुप नशिबवान आहोत.
तिने कित्येक वेळेस त्याला म्हटले सुद्धा, "जर मला दृष्टी लाभली असती तर तुझ्याशीच लग्न करून, शेवटपर्यंत साथ दिली असती."
आणि अचानक एके दिवशी चमत्कार झाला.
कोणीतरी तिला आपले डोळे देण्यास तयार झाला.
शेवटी यशस्वी शस्त्रक्रियेनंतर दिला दिसू लागले.
सर्व प्रथम तिने प्रियकराला पाहण्याचा हट्ट धरला.
त्याला पाहताच तिला जबरदस्त धक्का बसला.
तो चक्क आंधळा होता.
तेवढ्यात त्याने विचारले, "करशील आता माझ्याशी लग्न?"
तिने सहजतेने त्याचा प्रस्ताव नाकारला.
त्याने काहीही प्रतिक्रीया व्यक्त केली नाही.
तिच्यापासुन दुर जाताना फक्त एवढेच म्हणाला, "माझ्या डोळ्यांची काळजी घे."

प्रेमाला पण चव येण्यासाठी मिठाची गरज असते......


त्याला ती एका पार्टीत भेटली.
खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण होते.
ती सुंदर होती, बुध्दिमानही होती. सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी. पण ती कोणालाच जवळीक साधु देत नव्हती.
तो फार साधा, आर. के. लक्ष्मणच्या 'कॉमनमॅन' सारखा.
त्याला तर त्याचे मित्रही भाव देत नव्हते. मग तिच्यासारख्या मुली तर चंद्राइतक्या अप्राप्यच!
तिचं त्याच्याकडं लक्षही नव्हतं त्या पार्टीत. आपल्याच विश्वात मश्गुल होती ती!!!
पण आपण धाडस करायचच, असं ठरवून, सारं बळ एकवटुन त्यानं तिला विचारलं,
'तु पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील?'
तिला 'नाही' म्हणणं फार सोप्पं होतं. पण त्याच्या डोळ्यांतले नितळ, पारदर्शी भाव आणि आवाजातलं आर्जव जाणुन तिला का कोण जाणे, 'हो' म्हणावसं वाटलं.
ती 'हो' म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं.
या शक्यतेचा त्यानं विचारच केला नव्हता!!!
जवळच्याच कॉफी पार्लरमध्ये दोघं कोप-यातल्या टेबलावर बसली.
कॉफीची ऑर्डर दिली.
पण काय बोलायचं, हे त्याला सुचेचना! तो खुपच नर्व्हस झाला होता.
आणि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं तीसुध्दा अवघडली.
झक मारली आणि याला हो म्हटलं, असंही मनात आलं तिच्या!!!
कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला.
त्यानं वेटरला हाक मारली.
वेटर प्रश्नार्थक चेह-यानं टेबलाजवळ येऊन उभा राहीला.
तो म्हणाला, 'थोडं मीठ देता? मला कॉफीत टाकायचंय!'
सारं कॉफी शॉप या अनपेक्षित मागणीनं गोंधळात पडलं.
विचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहु लागले.
तीसुध्दा!
वेटरनं मुकाट्याने मीठ आणुन दिलं आणि देताना - "कैसे कैसे लोग आते है!" अशा अर्थाचा चेहराही केला.
त्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला!
ती खरंच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क  मीठ!
अखेरीस तिनं विचारलंच "पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली?"
"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं..." शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला...
"सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत धावत व्हरांड्यात येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे.
आता आई राहिली नाही. आणि ते समुद्रकाठचं घरही. पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे.
खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते..." भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला.
तिचं ह्र्दय भरून आलं - त्याच्या निरागसतेनं.
किती हळुवार होतं त्याचं मन.
मग तीही बोलली... आपल्या दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल... तिच्या स्वप्नांबद्दल... खरचं खुप छान डेट झाली ती!!!
मग ते पुन्हा पुन्हा भेटत राहीले.
अखेर तिला पटलं, हाच  आपला जीवनसाथी.
तो शांत होता. संयमी होता. हळुवार होता. तिची काळजी घेणारा होता.
मग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं!
चार-चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि दिवस खुप मजेत जाऊ लागले.
एखाद्या परीकथेसारखे.
खरंच त्यांचं आयुष्य खुप सुखी होतं.
ती त्याच्यासाठी सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा!
आणि हो, त्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमुटभर मीठही टाकायची त्या  कॉफीत!
अशीच भर्रकन ४० वर्षं कधी उडुन गेली, ते कळंलच नाही.
एके रात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी...!
काही दिवसांनी ती सावरली.
रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली.
एकदा सहज म्हणुन त्याचं पुस्तकांच कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली.
त्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती कधीतरी लिहीली होती.
"माझ्या प्रिये, मला माफ कर!
आयुष्यभर मी तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो, त्याबद्द्ल मला क्षमा कर! हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो...
पहिल्यांदा आणि शेवटचं! आयुष्यभर ही खंत मला जाचत राहिली. पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही...
केवळ तु मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने!
प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो, तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती!
त्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो, की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे.
आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं म्हणुन मी ते तसंच पुढे चालवून घेतलं...
खारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती!
पण मला तु खुप आवडतेस...
आणि तुला गमावू नये म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी मी पीत राहिलो...
...आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलंच पाहीजे  नाही तर हे खोटेपणाचं  ओझं मी पेलू शकणार नाही!
प्लीज - मला माफ करशील?"
रोज खारट चहा पिऊन त्याला ह्रदयरोग होतो आणि तो मरतो.....

तिला ठाऊक होतं ...त्याचं आपल्यावर अतोनात प्रेम आहे
तिचंही होतंच, कदाचित त्याच्यापेक्षा जास्तच !
दोघंही प्रेम करत होते एकमेकांवर जीवापाड ...
दोघांना ही होती मनापासून याची जाणीव ...
त्यालाही काही विचारायचं होतं ,
तिलाही काहीतरी बोलायचं होतं ,
पण ... दोघांनी सारं मनातच ठेवलं होतं !
शेवटी तिला सुचली एक कल्पना ...
नेहमीप्रमाणे भेटले दोघे एकदा एकांतात ...
ती लाडात येऊन म्हणाली ,
काल मला एक स्वप्नं पडलं ...
स्वप्नात कोणीतरी मला propose केलं ...
" will you marry me ? "
त्याने न राहवून विचारलं, मग उत्तर काय दिलंस ?
ती म्हणाली " हो शिवाय दुसरं काही सुचलंच नाही "
त्याने उत्सुकतेने विचारलं " कोण होता ? सांगशील का ? "
ती लाजून म्हणाली " वेड्या ! तूच , आणखी कोण ? "
तो खूश झाला, तिचा चेहरा आपल्या हातात धरून म्हणाला
" खरंच ? माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं "
ती गालातल्या गालात हसली ... आणि म्हणाली
" हो ..... मलाही ! " 


Friday 22 April 2011

हे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी

आणि लग्न होणार असलेल्यांनी .......

नक्कीच वाचा: विचार करा.

एका रात्री मी घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच.
जेवताना मी तिचा हात हातात
घेतला आणि म्हणालो, "मला तुझ्याशी काही बोलायचं आहे."

तिच्या डोळ्यांत वेदना उमटली;
तरीही ती शांतपणे जेवत होती,
सगळे शब्द जुळवून मी तीला सांगितलं,
मला घटस्पोट हवाय."

तिने शांतपणे विचारल,- "का?"

तिचा प्रश्न मी टाळला, ती भडकली.
समोरच ताट तिने भिरकावून दिलं.
लग्न मोडायला नेमकं काय कारण आहे,
हे तिल जाणून घ्यायचं होत;
पण माझं मन दुसऱ्या स्त्रीवर आलय हे मि तिला
स्पष्टपणे सांगू शकत नव्ह्तो.

माझा बँक ब्यालन्स, कार, घर, सगळ मी तिला देऊ केलं:
पण मी समोर केलेल्या घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले.

दुसऱ्या दिवसी तिने माझ्यासमोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला.
तिला माझ्याकडून काहीही नको होते, फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती आणि
या एक महिन्यात दोघांनीही नॉर्मल रहावं अशी तिची इश्च्या होती.
तिची कारणे साधी होती. महिन्या भरात आमच्या मुलाची परीक्षा होती
आणि त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता.
तिची आणखी एक अट होती.
लग्नाच्या दिवसी मी तिला बेडरूम पर्यंत कसं उचलून नेलं होत.
त्याप्रमाणे रोज महिनाभर तिला न्यायचं होत तशी तिची अटच होती.
मला वाटलं तिला वेड लागलंय; पण महिना व्यवस्थित जावा यासाठी मी तिची अट मान्य केली.

घटस्पोटाच्या विचारामुळे अनेक दिवस माझा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला नव्हता. त्यामुळे पहिल्या दिवसी बेडरूम पर्यंत तिला नेताना आम्ही दोघही फार अवघडून गेलो.
मी तिचा हात धरून बेडरूम पर्यंत नेतान माझ्या मुलाने
बघितलं आणि त्याला फार आनंद झाला.

दुसया दिवसी ती माझ्या छातीला टेकून होती.
आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस
नित बघितलेच नाही हे मला जाणवलं;
आणि तिचा सहवास मला अचानक हवाहवासा वाटू लागला. आपण हिच्या बाबतीत असा अचानक निर्णय का घेतोय,
असा प्रश्न पडला.
त्यानंतरच्या प्रत्येक दिवसी तिला उचलून किंवा सोबन बेडरूम पर्यंत नेताना आमच्यातली एक हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं मला जाणवलं.
रोजच्या प्रमाणे तिला अचानक उचलताना मला जाणवलं, तीच वजन कमी झालंय. हृदयातल्या वेदनाचां
हा परिणाम होता. मी आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला.

दिवसागणिक तिचं कमी होणारं वजन
माझी काळजी वाढवत होत. पण तिच्या अटीच
पालन करताना मला आंतरिक समाधान मिळत होत, आमच्यात काय घडतंय याची कल्पना
नसतानाही आमचा मुलगा खूप खुश होता.

आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवलीकच संपली होती.
जी परत आयुष्यात येत होती.

महिन्याच्या शेवटच्या दिवसी - मी मनाशी निर्णय घेतला. माझ्या प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्पोट देऊ शकत नसल्याच स्पष्टपणे सांगितले.
ती चिडली, संतापली, पण आता मला काही यैकायाच
नव्हते. माझ्या प्रिय पत्नीचा हात मला आता मरे पर्यंत सोडायचा नव्हता.
मी वेगाने CAR चालवत घरी आलो.
माझ्या चेहऱ्यावर हसू होत.
हातात फुलांचा गुच्छ होता. मी बेडरूम मध्ये पोहचलो, तर... माझी प्रिय पत्नी बेडवर निष्प्राण पडलेले होती.
मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो.
माझ्या प्रेमापायी तिने जीव दिला होता. ती असताना मी जे करायला हव ते केल नाही.
जे प्रेम , जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही. आता माझे अश्रू तिला परत आणू शकत नव्हते.

पती-पत्नीच्या नात्यात कार, बंगला, प्रेयसी, पैसा काहीही महत्वाच नाही.
महत्वाच आहे ते प्रेम, जवळीक आणि विश्वास.

प्रेम कि पैसा..............


तुझ्या रुपात मन कैद माझे झाले.

तो कविता वाचत होता.

"गप रे" ति वैतगली होति.
जरा सिरीयस बन. २ वर्षे झालीत..
बाबा मागे लागलेत लग्नासाठी..
माझा हो कळव.. तो हसत म्हणाला..
अन काय कळवणार? तुला ना नोकरी,
ना काहि व्यवसाय. अरे लग्न म्हणजे
गंमत नाहि.
अग गंमतच आहे. लग्न म्हणजे सहजिवन,
प्रेम,
एक मेकात आडकण.लग्न म्हणजे संलग्न.
वेडा आहेस. अरे लग्न म्हणजे संसार,
म्हणजे घर, दुध, किराणा, मुल, म्हणजे
पैसा..ति म्हणाली
हातात हात तुझा, अन तुझी साथ.
पैसा येइल. येतो. तो म्हणाला
पैसा म्हणजे परसातल प्राजक्ताच झाड
नाहि .
हालवल कि फुलांनी आंगण भरुन जात..तिन
फटकारल..
अग पण, तो बोलायच्या आतच ति म्हणाली..
पैसा कि प्रेम हा वाद विवाद कालबाह्य
आहे ..
प्रेमाच्या जागी प्रेम आहे, अन
पैसा त्याच्या जागि.
तु मल खुप आवडतोस.. पण तु मला विचार
करुन निर्णय दे.
तिन अल्टिमेटम दिला..
१५ ऑगस्ट चा दिवस होता आज खिशात पैसे
होते .
दिवस तिच्या बरोबर मजेत
घालवायचा होता .
त्यान तिला फोन केला.बर झाल, फोन
केलास,
मला पण तुझ्याशी बोलायच
आहे .ति म्हणाली.
नो प्रोब्लेम.. ताज मधे भेटु. काय?..
ति उडालीच.
ताज च्या थंडगार वातावरणात,
ति सुखावलि होति.
मग काय ठरल?.तिन विषयाला हात घातला.
तो बोलतच नव्हता. मी थांबु शकत नाहि.
हि आपली शेवटची भेट..
तिच्या बोलण्याला धार होति..
तो आतुन तुटत चालला होता..प्लिज..
अरे प्लिज काय? सारच कठीण
आहे.ति म्हणाली.
मी निघते? ..प्लीज थांब, मला एक
संधी दे..तो म्हणाला.
तु फक्त एक वर्ष दे मला, तुल पाहिजे
तेवढा पैसा देतो…तो म्हणाला.
ति खळखळुन हसली." वेडा रे"अरे
पैसा म्हणजे?…
आय नो.. त्यान वाक्य तोडल."किति पैसे
लागतात संसाराला?
लाखो रुपये ति म्हणाली..ठीक आहे. एक
डिल.तो म्हणाला.
आपण पुढच्या १५ ऑगस्ट ला आपण इथच, ताज
मधे,संध्याकाळी. ७ ला भेटु.
अन काय करु..तिन विचारल..
मी त्या दिवशी तुझ्या पायावर ७५ लाख
रुपये ओतिल…तुला संसारा साठी .
त्या चित्रपटांत हिरो हिरॉइन
ला नोटांनी अंघोळ घालतो तशी .अंघोळ
घालीन…
तो हसत म्हणाला."मॅड आहेस." पण म्हणुनच
तु मला आवडतो.ति..
पण वचन दे, वाट पहाशील म्हणुन..
तो म्हणाला.
ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस
वाटत नाहि. ति हासली. …..
continue…..
ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस
वाटत नाहि. ति हासली.
१५ ऑगस्ट.. तो तिचि ६ वाज ल्या पासुनच
वाट पहात होता.
तेच टेबल होत, मागच्या वर्षीच,
ति येइल? तो अस्वस्थ होता
७ वाजायला आले होते, अन तेवढ्यात
ति आत येताना दिसली.
तिच्याशी नजरानजर होतच त्यान हात
हलवला .
हाश हूश करत ति समोरच्या खुर्चीवर
बसली .
कशी आहेस? फार गरम होत आहे. पहिल
पाणी पिते.
म्हणत उठुन
ति त्याच्या समोरच्या ग्लास घ्यायल
वाकली .
ति वाकली असताना, त्याला ब्लाउज मधे
लपवलेल्या मंगळसुत्रचा पदर दिसला.
अग मी मागवतो म्हणेपर्यंत तिन ग्लास
तोंन्डाला लावला होता .
अरे फार पाणी पाणी झाल होत.. हं
आता बोल.
काय बोलु? तुच सांग. तिच्याकड बघत
तो म्हणाला.
मग काय? कुठे आहे ७५ लाख? ति हसत
म्हणाली..
त्याचा चेहेरा पड्ला होता., नाहि जमल,
तु म्हणालीच तेच खर.
७५ लाख काय ७५ रु जमले नाहि.
पैसा मिळवण कठिण आहे..
जाउ देत, मला माहित होत,
ति समजावणीच्या स्वरांत म्हणाली.
मल पण तसच वाटत होते. पण म्ह्टल
तुला शब्द दिला होता…
तो बघत होता ..अजुन काय?
पडलेल्या चेहे~यानि तो म्हणाला.
सांगु ति म्हणालि.. अरे माझ लग्न झाल,
घरचे मागे लगलेच होते.
तो बॅन्केत आहे, १ बेडरुम च घर आहे…
तुझ अस.. ति म्हणाली. सॉरी..
तुझ खर आहे., तु ठीकच केल,
माझ्याबरोबर…. वायाच गेल असत.
तो म्हणाला.. ठीक आहे. मी निघते,
तुला आता अस भेटण बर नाहि…ति.
बरोबर आहे. निघते.. ति म्हणाली..
तो तिच्या पाठमो~या आकृति कडे बघत
होता..
तो बराच वेळ तो बसुन होता. सार संपल
होत.
रुम च्या नोकरानि टॅक्सीत सामान भरल..
सर कुठे? टॅक्सी ड्रायव्हर ने
विचारले.
सहारा एयर पोर्ट. ईंटर नॅशनल टर्मीनल.
टॅक्सी वेगात चालली होति,
गार हवेच्या सपक्यान डोक शांत होत
होत .
विमान तळावर टॅक्सी थांबली,
त्यान ट्रॉलीत लगेज भरल.व भाड देवुन
तो निघाला,
सर,टॅक्सी ड्रायव्हर ने हाक मारली,
सर, तुमची बॅग राहिली आहे,
त्यान टॅक्सी ड्रायव्हर कड बघितल, अन
म्हणाला
बॅग तुला राहु देत, त्यात ७५ लाख
रुपये आहेत.
नाहितरी, मला आता त्याचा काहिच उपयोग
नाहि,
ड्रायव्हर बराच वेळ
त्याच्या पाठमो ~या आकृति कडे बघत
होता
--
--
तू इथून दूर गेल्यानंतर,
अनेक वाटा माज्या आहेत,
पण पावला पावलावर
आठवणीमात्र तुज्याच आहेत...... .